"लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी,  जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
 धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,  एवढ्या जगात माय मानतो मराठी " सुरेश भट 
महाराष्ट्र 'मंडळ नेदरलँड्सने हाती घेतलेल्या "माझी शाळा" या उपक्रमांतर्गत "बालभारती मराठी वर्ग दर  रविवारी सुरु होत आहेत. 
प्रार्थनेने सुरु होणाऱ्या या वर्गात मुलांना मुळाक्षरापासून मराठी साहित्याची, संस्कृतीची  लागावी या साठी विविध  प्रयन्त केले जातील. माध्यमाची भाषा आवश्यक असल्यास इंग्रजी हि वापरण्यात येईल. 
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्याथ्यांनी पालकांनी आणि सहकाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहिती साठी महाराष्ट्र मंडळाकडे संपर्क साधावा.