Mrudgandh 2016

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र मंडळ नेदरलॅंड्सने संकल्पित केलेल्या "मृदगंध" ­- गंध आपׂल्या मातीचा ‌ह्या कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष होते. आपׂल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मंडळाने हौशी कलाकारांच्या साथीने कार्यक्रमाची दोन भागात विभागणी केली होती. कार्यक्रमाची सुरवात गगन सदन ‌ह्या अनुश्री जोशी ‌ह्यांच्या गाण्याने झाली. सोबत राम रघुनदंना, का रे दुरावा, घन घन माला, सजल नयन अशी लोकप्रिय गाणी मंडळाच्या प्रियांका भिडे ,नितांत शिंदे, मनोज कोळी ‌ह्या नवोदित कलाकारांनी सादर केली. तबׂल्यावर बालकुमार आणि पेटीवर मिश्र ह्यांची उत्तम साथ गायक कलाकाराना लाभली.

गाण्यांचा आस्वाद घेतानाच मध्ये मध्ये एकपात्री प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. गौरी कुलकर्णी ‌ह्यांनी सादर केलेले "शांतता कोर्ट चालू आहे"‌ ह्या नाटकातील स्वगत तर शलाका वैद्य ‌यांनी साकारलेली "चारचौघी "मधील विद्याची भूमिका प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेली. मोनाली पाटील ह्यांनी "निरपेक्ष प्रेम" ही स्वरचित कथा पुराणकाळाचा आधार घेऊन अतिशय सोप्या शब्दांत सादर केली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात वृषाली पाटकर आणि क्षितिज ठाकूर ‌ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या "मेघदूत "‌ ह्या कालिदास लिखित खंडकाव्यावर नृत्यनाटिका सादर करण्यात आली. वय वर्ष ४ पासून ४० पर्यंत सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तमरीत्या आपली कला सादर केली. ह्या कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन वृषाली पाटकर ‌ह्यांनी केले होते.

कार्यक्रमाच्या मध्यांतरात मराठी भाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पाडण्यात आला. संपूण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित परुळेकर ह्यांनी आपल्या खुमासदार शैलीत पार पाडले. गरमागरम सामोसे आणि वाफाळलेल्या चहा वर ताव मारत प्रेक्षक आपल्या मायदेशीच्या आठवणीना उजाळा देत घरी परतले.…

Photo

** कार्यक्रमांचे सगळे फोटो बघण्यासाठी येथे क्लिक करा : MMNL Event Photos

Videos

कार्यक्रमांचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा : MMNL Event videos