कविता

आभाळीच्या देवा तुझी माया मला लाभू दे

मंडळाचा वृक्ष सदा पानोपानी बहरू दे !

तीन वर्षांपूर्वी पेरले

बीज हे सानुकले

रोप छान बहरले

वृक्षाचीही छाया सर्व मंडळीना लाभू दे !

अम्स्तेर्दमच्या हिरवाईत

कलाकारांच्या कौतुकात

आनंदाची बरसात

स्वरानंदी आज आम्हा सर्वानाही रंगू दे !

माझ्या मराठीचा बोलू

गगनावरी गेला वेलू

परदेशात नाती जोडू

स्नेहाचा हा गोफ सकलजनानाही विणू दे !

-सौ .पूर्वा कोर्डे